नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना 73 कोटी 43 हजारांची मदत, कोकणसाठी 37 लाख 40 हजार

राज्यात जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना 73 कोटी 91 लाख 43 हजारांच्या मदतीस राज्य शासनाने आज मान्यता दिली. या नुकसानभरपाईच्या रकमेतून कर्जाची वसुली करू नये, असे आदेश राज्य सरकारने बँकांसाठी जारी केले आहेत.

जून 2025 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी रायगड जिह्यातील 980 बाधित शेतकऱयांच्या 55.65 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 11 लाख 81 हजार रुपये, रत्नागिरी जिह्यातील 560 शेतकऱयांच्या 71.54 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 12 लाख 96 हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिह्यातील 335 शेतकऱयांच्या 50.64 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 12 लाख 63 हजार रुपये असे 1 हजार 875 शेतकऱयांच्या 177.83 हेक्टरवरील  बाधित झालेल्या पिकांसाठी मदत म्हणून 37  लाख 40 हजार रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिह्यात जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत शेत पिकांच्या नुकसानीपोटी 73 कोटी 54 लाख 3 हजार मदतीचा समावेश असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

शासनाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे केले… ही मदत देण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱयांना उभारी मिळेल.

मकरंद जाधव-पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री