
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्याची डेडलाईन 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात येत असल्याचा सोशल मीडियावरचा दावा खोटा आहे, असे आयकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आयटीआरची डेडलाईन 15 सप्टेंबर होती ती वाढवली नाही, असेही आयकर विभागाने सांगितले. आयकर विभागाच्या अधिकृत एक्स हँडलवर डेडलाईनसंबंधी सविस्तर माहिती दिली आहे.