
खासगी रुग्णालयात रुग्ण भरती केल्यानंतर त्यांच्याकडून पैशांची लूट केली जाते. नको त्या गोष्टीला भरमसाट बिल आकारले जाते, परंतु पुढे काय करावे हे कळत नाही.
जर तुम्हाला हॉस्पिटलचे जास्त बिल आले, तर सर्वात आधी बिलाची तपशीलवर तपासणी करा. जे चुकीचे बिल वाटते, त्याची हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला माहिती द्या.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेताना अंतिम बिल पूर्ण तपासा. अनावश्यक बिल आकारले का हे तपासून घ्या. ज्या चुका वाटल्या, त्या रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगा.
हॉस्पिटलचे बिल दुरुस्त करण्यासाठी लेखी अर्ज करा. अर्जासोबत सर्व तक्रारींचा तपशील द्या. हॉस्पिटलने तुमचे ऐकून घेतले नाही, तर ग्राहक मंचाकडे याची तक्रार करा.
जर तुमचा विमा असेल तर विमा कंपनीच्या संबंधित विभागाशी संपर्क साधा. विमा पॉलिसीनुसार, बिलात काही कपात किंवा बदल करता येतो का हे तपासा.