
ऑनलाइन गेम फ्री फायरच्या आहारी गेलेल्या एका 13 वर्षीय मुलाच्या चुकीमुळे वडिलांच्या खात्यातून तब्बल 14 लाख रुपये गेले. या मुलाच्या वडिलांनी घर बनवण्यासाठी गावची शेती विकली. ते पैसे बँक खात्यात जमा केले होते. शाळेतून घरी आल्यानंतर यश नेहमी वडिलांच्या मोबाईलमध्ये फ्री फायर गेम खेळत असायचा. 20 हजार रुपयांची रक्कम काढण्यासाठी यशचे वडील बँकेत गेले होते. खात्यात पैसे नाही, हे समजल्यावर त्यांना धक्का बसला. फ्री फायर गेमवर सर्व पैसे खर्च झाले, असे बँकेने सांगितले.