
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मास्टरलिस्टवरील संक्रमण शिबिरात वास्तव्यास असणाऱ्या मूळ भाडेकरू, रहिवासी अथवा त्यांचे वारसदार यांची पात्रता निश्चिती करून गाळे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी संबंधितांकडून 30 सप्टेंबर रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंतच अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदारांकरिता ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्याकरिता masterlist.mhada.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे प्रत्यक्ष 30 दिवसांत कक्ष क्र. 372, दुसरा मजला, म्हाडा मुख्यालय, वांद्रे पूर्व येथे सादर करावीत.