अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग धोरण जाहीर

राज्याच्या अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिऑलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) धोरण 2025 ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे दोन लाख रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

या धोरणात 2050 या वर्षांपर्यंतची आखणी करण्यात आली असून त्यासाठी सुमारे 3 हजार 268 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यापूर्वी कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, केरळ व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये असे धोरण तयार करण्यात आले आहे.

अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिऑलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) हे क्षेत्र देशाच्या मीडिया आणि एंटरटेनमेंट (एम अ‍ॅण्ड ई) उद्योगाचा महत्त्वाचा घटक मानला जातो.

महाराष्ट्रात अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिऑलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) या क्षेत्रात 295 हून अधिक स्टुडिओ आहेत. देशात सर्वाधिक म्हणजे 30 टक्के स्टुडिओ हे महाराष्ट्रात आहेत. मुंबई, पुणे येथे अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस आणि गेमिंगसाठीच्या शैक्षणिक सुविधा देणाऱ्या 20 संस्था आहेत.