
कोल्हापूरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. शिवराम बाबुराव भोजे (वय 83) यांचे आज कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशाच्या अणुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रात 40 वर्षांहून अधिक काळ त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा समितीचे सदस्य म्हणून हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा व योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.