कर्नाटकात चोरांनी एसबीआय बँकच लुटली

कर्नाटकातील विजयपुरा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन चोरटय़ांनी बँक लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून तसेच कर्मचाऱ्यांना बांधून बँकेतील 20 कोटींची रोख रक्कम आणि 20 किलो सोने घेऊन चोर पसार झाले. बँकेतील एकूण 21 कोटी रुपयांचा माल चोरट्यांनी पळवून नेला आहे.