
दहशतवादी पाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटला आहे. ‘‘हिंदुस्थानच्या संसदेवरील हल्ला आणि ‘26/11’च्या मुंबई हल्ल्यामागे मसूद अझहरच होता,’’ अशी कबुली जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने दिली आहे. एका व्हिडीओमध्ये इलियास काश्मिरीने हा खुलासा केला आहे. ‘‘दिल्लीच्या तिहार तुरुंगातून पाच वर्षांनी सुटका झाल्यानंतर मसूद अझहर पाकिस्तानात आला. बालाकोटमध्ये त्याने तळ ठोकला होता. तिथेच त्याने हिंदुस्थानवर हल्ला करण्याची योजना आखली होती.