मेहुल, कमलेश जैन यांच्या जामिनावर उद्या सुनावणी

तब्बल 30 कोटी 52 लाख रुपयांचा जीएसटी घोटाळा प्रकरणात मेहुल जैन आणि कमलेश जैन यांना अटक करण्यात आली. सध्या हे दोघे दंडाधिकारी कोठडीमध्ये असून तेथे त्यांना चांगली वागणूक मिळत असल्याचा आरोप तक्रारदार विश्वास टाकळकर यांनी केला आहे. त्यांच्या जामिनावर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

मेहूल आणि कमलेश जैन यांना अटक झाल्यानंतर त्यांची पोलीस कोठडी संपल्यावर दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान जैन यांच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर 15 तारखेला सुनावणी होणार होती, परंतु त्या दिवशी जामीन अर्जावर युक्तिवाद होऊ शकला नाही. आता 19 सप्टेंबर ही पुढील तारीख पडली आहे. त्या दिवशी जैन यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल तेव्हा जैन यांचा जामीन नाकारण्यात यावा यासाठी आम्ही जोरदारपणे बाजू मांडणार असल्याचे अ‍ॅड. मेश्राम यांनी सांगितले.