वैद्यकीय प्रवेशाची दुसरी निवड यादी 24 सप्टेंबरला

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसऱ्या फेरीची निवड यादी 24 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. वैद्यकीय समुपदेशन समितीने अखिल भारतीय कोट्याच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षानेही दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील 19 सप्टेंबर रोजी जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना 20 ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये पसंतीक्रम भरण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. पसंतीक्रम भरलेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी 24 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. निवड यादीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना 25 ते 29 सप्टेंबर या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.