
नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. आदिशक्तीच्या, निर्मितीशक्तीच्या पूजेचा उत्सव. नवरात्र म्हटले की दांडिया आणि गरबाच्या जोडीला नऊ रंग आलेच. प्रत्येक दिवशी वेगळा रंग. विशिष्ट रंगांचा पेहराव करून नवरात्रींचा आनंद द्विगुणित करायचा, ही जणू परंपराचा बनली आहे. या परंपरेत सहभागी व्हायला आणि रंगात न्हाऊन निघायला तुम्ही सज्ज असालच. तुमची नऊ रंगांतील साडीच्या पेहरावातीलच रोजची छायाचित्रे दैनिक ‘सामना’च्या कार्यालयात पाठवा. आपण पाठवलेल्या फोटोमध्ये किमान पाच महिला असणे आवश्यक आहे. ही छायाचित्रे दैनिक ‘सामना’मध्ये प्रकाशित करण्यात येतील. छायाचित्रांसोबत तुमच्या ग्रुपचे, संस्था वा कार्यालयाचे नाव लिहावे. चला तर मग उत्सव रंगांचा साजरा करूयात.
भाग्यवंतांना मिळणार रूपसंगमची साडी
दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रांतील दोन भाग्यवंत महिलांना दररोज दादर येथील प्रसिद्ध रूपसंगम यांच्या वतीने साडी देण्यात येणार आहे. दैनिक ‘सामना’तर्फे ही आगळी भेट देण्यात येणार आहे.
पत्ता ः दैनिक ‘सामना’, मुंबई विभाग, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, प्रभादेवी, मुंबई – 400025, ई-मेल [email protected] [email protected]
सोमवार, 22 सप्टेंबर – पांढरा
मंगळवार, 23 सप्टेंबर – लाल
बुधवार, 24 सप्टेंबर – निळा
गुरुवार, 25 सप्टेंबर – पिवळा
शुक्रवार, 26 सप्टेंबर – हिरवा
शनिवार, 27 सप्टेंबर – करडा/ग्रे
रविवार, 28 सप्टेंबर – केशरी/भगवा
सोमवार, 29 सप्टेंबर – मोरपिशी
मंगळवार, 30 सप्टेंबर – गुलाबी
बुधवार, 1 ऑक्टोबर – जांभळा