
आदिवासी बांधवांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटणारे डॉ. विजय साठे (69) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी इंदवी, मुले आदीम व चेतन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. विजय साठे वननिकेतन आणि श्रमिक मुक्ती संघटनेची स्थापना करून मुरबाड येथे ते कायमचे स्थायिक झाले. आदीम कातकरी आदिवासींच्या जीवनमरणाचे प्रश्न-वेठबिगार मुक्ती, विस्थापन व जमिनींचे प्रश्न सोडविण्यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. त्यांना 2024 साली त्यांना स्वातंत्र्यसैनिक रा. वि. भुस्कुटे स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.