
सध्या सोशल मीडियावर AI चा एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालतोय. इन्स्टाग्राम असो की फेसबुक, कोणत्याही सोशल मीडिया साईटवर एआयच्या माध्यमातून तयार केलेले फोटो व्हायरल होत आहेत. तुम्ही सांगाल त्या रंगाच्या साडीतील फोटोची तरुणींना भुरळ पडली आहे. आत्तापर्यंत हजारो तरूणींना Gemini AI वर फोटो तयार करून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र एआयच्या हा ट्रेंडकडे अनेकांनी दुर्लक्ष केलंय. एआयचा हा ट्रेंड धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. अशातच टाटा ग्रुपचे कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांनेही प्रतिक्रिया दिली आहे.
दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा मित्र शंतनू नायडू सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. एआयच्या या नव्या ट्रेंडबाबत यांने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये त्याने ट्रेंडबाबत मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. सध्या तरूणी त्यांच्या सोशल मीडियावर एआय-जनरेटेड साडीतील फोटो शेअर करत आहेत. पण मला समजत नाही की त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या गोष्टीसाठी त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची आवश्यकता का भासतेय? असा प्रश्न शंतनूने त्याच्या पोस्टमधून विचारला आहे.
View this post on Instagram
शंतनू म्हणाला की, तुम्ही हिंदुस्थानात राहताय, अमेरिकेत नाही. हिंदुस्थान म्हणजे साड्यांच माहेरघर… आताच्या घडीला तुमच्या कपाटात किमान 15 साड्या तरी असतील. तरीही तुम्ही एआयला वेगवेगळ्या साड्यांमधील फोटो बनवायला सांगितले, जे आधीच तुमच्या कपाटात आहेत. म्हणजे तुम्ही किती आळशी झाला आहात. जे तुमच्याकडे आहे त्याचेच फोटो तुम्ही एआय कडून बनवून घेताय. काय गरज आहे याची… तुम्ही घरात असलेल्या साड्या परिधान करा आणि फोटो काढा. त्यात तुम्ही फार सुंदर दिसता आणि आईच्या साडीत तर खुपच सुंदर दिसता. त्यामुळे एवढे कष्ट घेण्यापेक्षा साडी नेसा आणि सुंदर फोटो काढा…, असा सल्ला शंतनूने दिला आहे.