ज्येष्ठ महिला शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता शेटये यांचे निधन

भोईवाडा येथील ज्येष्ठ महिला शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता शेटये (68) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. शिवसेनेचे माजी पदाधिकारी विजेंद्र शेटये यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत विभागातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक तसेच शिवसैनिक सहभागी झाले होते.