
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर आज जालन्यात हल्ला झाला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
गुणरत्न सदावर्ते हे जालना जिह्यातील धनगर समाजाच्या उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी जात होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरून पुढे जात होता. पोलिसांनी या वेळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रस्त्याच्या दुतर्फा आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना चुकवून गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. काही आंदोलकांनी गाडीकडे धाव घेत गाडीच्या काचेवर फटके मारले.