
अनेक वर्षांपासून रखडलेले जमीन, मालमत्तेशी संबंधित वाद निकाली निघणार आहेत. प्रलंबित असलेल्या अपील प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा भूमी अभिलेख, मुंबई उपनगरच्या वतीने भूमी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही लोकअदालत गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी वांद्रे येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात होणार आहे.
या लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित अपील प्रकरणांवर सुसंवाद व चर्चेच्या माध्यमातून व तडजोडीमार्फत जलद न्याय दिला जाणार आहे. यात अपिलीय प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे. या लोकअदालीचा हेतू पारदर्शक पद्धतीने विविध प्रकरणे सोडवण्याचा आहे. त्यामुळे वेळेची व संसाधनाची बचत होणार आहे. त्यासाठी तडजोडनामा अर्ज जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख मुंबई उपनगर जिल्हा या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच collectormumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कृष्णात कणसे यांनी केले आहे.