हे करून पहा- लॅपटॉप साफ करायचा आहे…

बऱ्याच दिवस लक्ष न दिल्याने लॅपटॉपच्या आत धूळ आणि घाण जमा होऊ शकते व त्याचा परिणाम लॅपटॉपवर होऊ शकतो. लॅपटॉपची साफसफाई सुरू करण्यापूर्वी लॅपटॉप पूर्णपणे बंद आहे का आणि पॉवर सोर्सशी जोडलेला नाही याची खात्री करून घ्या. कीबोर्डमध्ये साचलेली धूळ काढून टाकण्यासाठी कीबोर्ड कंप्रेस्ड एयरचा वापर करा.

लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरून हळुवारपणे स्क्रीन पुसून घ्या. जर स्क्रीनवर डाग असेल तर आपण मायक्रोफायबरचे कापड थोडेसे पाण्याने किंवा स्क्रीन क्लीनरने थोडे ओले करून हलक्या हाताने स्क्रीन साफ करून घ्या. कोणतेही लिक्विड वापरू नका. लॅपटॉपमधील छोटे पार्ट स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्स वापरा.