Photo – तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. या निमित्त तुळजाभवानी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर सजावटीसाठी सुमारे अडीच टन फुलांचा वापर करण्यात आलेला आहे. शेवंती गुलाब झेंडू ऑर्किड यासह विविध फुलांचा वापर करून मंदिर सजविण्यात आले आहे.