
Asia Cup 2025 मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरू आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाची यंग ब्रिगेड दमदार फॉर्मात आहे. आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यांमध्ये टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व गाजवत विरोधी संघांना चारीमुंड्या चित केले आहे. आशिया चषकाचा थरार संपला की, टीम इंडियाचा आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्यो दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. अशातच आता टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.
आशिया चषकाचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर पासून टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात होईल. पुढील काही दिवसांमध्ये मालिकेसाठी संघ निवड सुद्धा केली जाईल. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असल्यामुळे दोन्ही संघांसाठी विजयाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे ऋषभ पंत सारखा आक्रमक फलंदाजाचा संघाला फायदा होऊ शकतो. परंतु ESPNCricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत या मालिकेला मुकू शकतो. BCCI ची निवड समिती 24 सप्टेंबरला बैठक घेणार आहे. त्यानंतर संघाची घोषणा केली जाणार आहे.
Asia Cup 2025 – अभिषेक शर्माचा ‘Aura’, पाकड्यांची जिरवली आणि हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी केली
ऍण्डरसन-तेंडुलकर करंडकातीत चौथ्या कसोटीमध्ये फलंदाजी करत असताना ऋषभ पंतच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो पाचव्या कसोटीमध्येही खेळू शकला नाही. दरम्यान, 2 ऑक्टोबर पासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिल्या कसोटीला सुरुवात होईल. तसेच दुसरा कसोटी सामना 10 ऑक्टोबर पासून दिल्लीच्या अरून जेटली स्टेडियमवर खेळला जाणार.