
सोशल मीडियावर सध्या एआयपासून हटके फोटो बनवण्याचा ट्रेंडच आला आहे. नॅनो बनाना हे एआयचे फोटो टूल वापरून फोटो बनवले जात आहेत. साडीतील रेट्रो लुकनंतर आता या टूल्सचा वापर करून नवरात्री स्पेशल फोटो बनवण्याकडे युजर्सचा कल दिसून येत आहे. नवरात्रीमध्ये दांडिया, दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळतो. त्यानुसार सोशल मीडियावर मुलींनी घाघरा चोळी घातलेले, हातात दांडिया धरून आणि 90 च्या दशकातील बॉलीवूड चित्रपटासारख्या पोज देत फोटो बनवले जात आहेत. फोटो बनवणे एकदम सोपे आहे. त्यासाठी गुगल प्ले स्टोरवरून किंवा ऍपल ऍपवरून जेमिनी ऍप डाऊनलोड करावे लागेल. गुगल खाते वापरून साइन इन करून स्वतःचे फोटो अपलोड करावे लागतात.