उल्हासनगरात चौघांवर मोक्का; तीन अल्पवयीन मुलांचा समावेश, नंग्या तलवारी नाचवत महिलेवर वार; गाड्यांची तोडफोड

नाचवत परिसरातील गाड्यांची तोडफोड व नागरिकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणातील चौघांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या चौघांमधील तीनजण हे अल्पवयीन असून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाईची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. या कारवाईनंतर गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

आशेळे गाव पाड्यात सुमित कदम उर्फ लाला आणि त्याच्या तीन साथीदारांनी काही महिन्यांपूर्वी तलवारीचा धाक दाखवत परिसरात धिंगाणा घातला होता. गाड्यांची तोडफोड करत एका महिलेवरदेखील वार केले होते. या घटनेनंतर ते चौघेही फरार झाले होते. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे व उपनिरीक्षक बंकट दराडे यांनी विशेष पथके तयार करत या माथेफिरूंचा शोध सुरू केला. अखेर सुमित हा बदलापुरात लपून बसल्याची माहिती मिळताच पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

प्रस्ताव सादर केला

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण यांना मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला. त्याला मंजुरी प्राप्त होताच पोलिसांनी सुमित कदम व तीन अल्पवयीन मुलांवर ही कारवाई केली.