
महागौरी ही नवदुर्गांपैकी एक असून ती आठवी देवी आहे. यंदा 10 दिवस नवरात्र असल्याने यंदा नवव्या दिवशी महागैरी देवीची पूजा करण्यात येणार आहे. महागौरी देवी हे महाशक्तीचे नवदुर्गांपैकी आठवे स्वरूप आहे.ती पवित्रता, शांती आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. तसेच या देवीच्या उपासनेने दैवी आणि अलौकिक सिद्धी प्राप्त होतात, असी मान्यता आहे.
महागैरी देवी पांढऱ्या बैलावर स्वार असून चतुर्भुजा स्वरुपात आहे. तिच्या एका हातात त्रिशूळ, दुसरा हात अभयमुद्रेत, डाव्या हातात डमरू आणि डावा हात आशिर्वाद मुद्रेत असतो. यंदा नवरात्रीच्या नवव्या दिवशी महागैरीची पूजा करण्यात येणार आहे. सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण करणारी आणि अलौकिक सुद्धी देणारी ही देवी असल्याने या देवीच्या उपासनेला महत्त्व आहे.
महागौरी म्हणजे महान गौरी किंवा तेजस्वी देवी. हे नाव तिच्या शुभ्र रंगाचे प्रतीक आहे. ही देवी पांढरे कपडे परिधान करते. तिचा चेहरा शांत आणि सौम्य असतो. ती पांढऱ्या बैलावर स्वार असते, जे तिच्या पवित्रतेचे आणि शांतीचे प्रतीक आहे. ती चतुर्भुजा असून तिच्या दोन हातात त्रिशूळ, डमरू असून दोन हात अभयमुद्रा आणि आशिर्वाद मुद्रेत आहेत.
देवी महागौरी शांती आणि ज्ञानाचे प्रतीक असून ती शांती, पवित्रता आणि ज्ञान आणते. महागौरी देवी भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते असे मानले जाते. महागौरी माता शक्ती किंवा मातृदेवी आहे. ती दुर्गा, पार्वती, काली आणि इतर अनेक रूपांमध्ये प्रकट होते. ती शुभ, तेजस्वी आहे आणि वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करत चांगल्या लोकांचे रक्षण करते. गौरी माता आध्यात्मिक साधकाला ज्ञान देते आणि मृत्यूचे भय दूर करते, अशी मान्यता आहे. पार्वती रूपात देवीने भगवान शंकराला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. या कठोर तपस्येमुळे तिचे शरीर काळे पडले होते. तिच्या कठोर तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकराने तिला गंगेच्या पवित्र पाण्याने आंघोळ घातल्यावर ती अत्यंत गोरी दिसू लागली. तेव्हापासून तिला महागौरी या नावाने संबोधले जाते.