
दिवाळी आणि छट पूजेपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (२४ सप्टेंबर २०२५) झालेल्या बैठकीत १०.९१ लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस म्हणून १,८६५.६८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला जाईल असे सरकारने म्हटले आहे.
या बैठकीत बिहारमधील बख्तियारपूर-राजगीर-तिळैया रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मान्यता दिली. याची किंमत ₹२,१९२ कोटी आहे. बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग-१३९ डब्ल्यू च्या साहिबगंज-अरेराज-बेतिया विभागावर हायब्रिड अॅन्युइटी मोडच्या बांधकामाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाची लांबी ७८.९४२ किलोमीटर असेल आणि त्याची किंमत ₹३,८२२.३१ कोटी असेल.
जहाजबांधणी, सागरी वित्तपुरवठा आणि देशांतर्गत क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी ₹६९,७२५ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर करण्यात आले आहे.