
हिंदुस्थानी जेवणात भाताला मोठे स्थान आहे. वरणासोबत असो किंवा कोणतीही भाजी तसेच, मांसाहार हा भाताशिवाय अपुर्ण आहे. भाताचे अनेक प्रकार हिंदुस्थानात बनवले जातात जसे कि पुलाव, बिर्याणी, खीर, किंवा स्नॅक्स. मात्र भात शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्या शरिरावर परिणाम करु शकतात. अनेकांच्या घरात भात प्रेशर कुकरमध्ये तर काहींच्या घरी टोपामध्ये शिजवतात. तसेच मधुमेह असलेल्या रुग्णांना भात खाण्यास मनाई असते मात्र भात योग्य प्रकारे शिजवल्याने मधुमेही रुग्ण देखील भात खाऊ शकतात.
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवणे योग्य का टोपात?
कुकरमध्ये भात 2 शिट्ट्यांमध्ये शिजतो आणि या प्रक्रियेला वेळ देखील कमी लागतो. कुकरमध्ये भात शिजवल्याने भातातील न्युट्रीशन तसेच राहतात तसेच, भाताचा स्टार्च देखील तसाच राहतोय यामुळे जास्त वेळ पोट भरलेले राहते आणि भूक कमी लागते. यामुळे वजन नियंत्रणासाठी हा एक चांगला पर्याय बनतो. प्रेशर कुकरमध्ये भात शिजवणे पचनासाठी चांगला पर्याय आहे.
काही लोक भात टोपात शिजवतात. व्यायाम करणारे लोक टोपात शिजवलेला भात खाणे पसंत करतात. या भातामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, जे ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. भात टोपात शिजवल्याने स्टार्च जिलेटिनाइज मध्ये बदलतो. असा भात उर्जेचा चांगला स्रोत मानला जातो. कमी आचेवर भात शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे भातातील स्टार्चमध्ये मिसळतात आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.