
विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात आजपासून पोट विकार बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता तथा कूपर रुग्णालय पर्यवेक्षकीय समितीचे सदस्य डॉ. शैलेश मोहिते यांच्या हस्ते आज या बाह्यरुग्ण विभागाचा शुभारंभ करण्यात आला. औषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख व पदव्युत्तर अधिष्ठाता डॉ. नीलम रेडकर यांनी हा विभाग सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला. हा बाह्यरुग्ण विभाग दर बुधवारी दुपारी 1 ते 3 या वेळेत कार्यरत राहणार आहे. या विभागासाठी डॉ. जयंत बर्वे व डॉ. शोभना भाटिया यांची मानद अतिविशेषोपचार तज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
            
		





































    
    






















