
नालासोपाऱ्याच्या संतोष भवन परिसरातील शेकडो उत्तर भारतीय, आदिवासी आणि मुस्लिम बांधवांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उपजिल्हाप्रमुख दिलीप चेंदवणकर, तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे, महिला विधानसभा संघटक हेमलता भगत, विभागप्रमुख दिलीप कुवेसकर, उपविभागप्रमुख प्रकाश गावड, शाखाप्रमुख तुकाराम तिवरेकर, शाखाप्रमुख अकबर शहा, उपशाखाप्रमुख सुधाकर भुवड आदी उपस्थित होते.