
सध्या देशभरात नवरात्रीची धूम सुरू आहे. तरुण तरुणी गरब्याच्या तालावर ठेका धरत आहेत. मात्र तरुणांच्या गरब्याच्या प्लॅनवर पाणी फिरवायला वरूण राजा सज्ज झाला आहे. मुंबईत पुढचे तीन दिवस हे पावसाचे असून हवामान खात्याने मुंबईला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईला ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात आठवड्याच्या शेवटी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी 27 सप्टेंबर रोजी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात मुसळधार पावसासोबत वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.