
राज्याच्या अतिवृष्टी झालेल्या भागात विविध क्षेत्रांतून मदतीचा ओघ सुरू झाला असताना पालिकेच्या अभियंत्यांनी आपला एक दिवसाचा पगार शेतकऱयांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी म्युनिसिपल इंजिनीयर्स असोसिएशनने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र दिले आहे.
राज्यावर पूरस्थितीसारखे संकट येते तेव्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदतीचा हातभार लावला जातो. यापूर्वीही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी अधिकाऱयांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत केलेली आहे. तीच परंपरा कायम ठेवत त्यांनी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय आयुक्तांना सांगितल्याची माहिती म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भुतेकर यांनी दिली.