
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे. संकटाची मालिका कशी असते याचा प्रत्यय वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे आला. बीडमधील कुंडलिका नदीला महापूर आला. या महापुरात शेतकऱ्याने आपली जनावरे मोठ्या शर्थीने वाचवली. त्यात सहा शेळ्या आणि दोन मेंढ्यांना सुरक्षितस्थळी आणण्यात यश मिळाले. मात्र दोन दिवसानेच पहाटे बिबट्याने सहा शेळ्या आणि दोन मेंढ्याच्या फडशा पाडला. यामुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे.
वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील किशोर सिद्धू वडजकर या शेतकर्याने सकाळी गोठ्याची साफसफाई केली आणि स्नानासाठी घरी गेला असता तितक्या वेळात बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या सहा शेळ्या आणि दोन मेंढ्याच्या फडशा पाडला आहे. शेतकरी जेव्हा परत शेतात आला तेव्हा त्याला ही दुर्घटना दिसली. दोन दिवसापूर्वीच कुंडलिका नदीला आलेल्या पुरातून या शेळ्या आणि मेंढ्या शेतकर्याने वाचवल्या होत्या. मात्र दोनच दिवसात नवे संकट उभे राहिल्याने शेतकरी हाताश झाला आहे.