
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक भागात पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे संसार व शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अजय चौधरी व मिलिंद नार्वेकर यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या दोन्ही आमदारांनी त्यांच्या मदतीचा चेक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शिवसेना आमदार अजय चौधरी आणि शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर ह्यांनी आज मदतीचा धनादेश पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्याकडे सुपूर्द केला. pic.twitter.com/5wubRuYvYq
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 27, 2025