कपिल शर्माकडे खंडणी मागणारा गजाआड

कॉमेडियन कपिल शर्मा याला एक कोटीच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या पश्चिम बंगालमधील दिलीप चौधरी याला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-8 च्या पथकाने पकडून आणले. त्याला न्यायालयाने 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

शुभम पुजारी हा कपिल शर्मा याच्याकडे काम करतो. त्याला एका अज्ञाताचा कॉल आला होता आणि त्याने कपिल शर्मा याला एक कोटीची खंडणी द्यायला सांग अशी धमकी दिली होती. याप्रकरणी शुभमने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन दिलीप चौधरी याला अटक केली.