परदेशी ड्रग्ज माफिया गजाआड

वनराई पोलीस व कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ड्रग्ज माफियांविरोधात धडक कारवाई केली. नायजेरिया व आयव्हरी कोस्ट देशाच्या दोघा नागरिकांना पकडून त्यांच्याकडून कोकेन जप्त केला, तर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी 30 वर्षांच्या तरुणाकडून हेरॉईन ड्रग्ज हस्तगत केले.

गोरेगाव पूर्वेकडील व्हेटरनरी इस्पितळ परिसरात दुचाकीवरून ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या दोघा परदेशी नागरिकांना वनराई पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दीड लाख किमतीचे सहा ग्रॅम कोकेन मिळून आले. त्यातील एक नायजेरियन तर दुसरा आयव्हरी कोस्टचा नागरिक आहे. त्याचबरोबर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दहिसरमध्ये राहणाऱया समरी अली याला हेरॉईन ड्रग्जसह पकडले.