Photo – औरादला पुन्हा पुराचा तडाखा, शेकडो हेक्टर शेती पाण्यासाठी

निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या औराद शहाजानी ते वांजरखेडा संगमावर नदीपात्रापेक्षा सहा पटीने पाणीपातळी वाढलेली आहे. त्यामुळे जवळपास नदीपात्रापासुन ५०० मिटर अंतरावर पाणी शेती व परीसरात पसरलेले आहे. त्यामुळे औराद शहाजानी येथील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीमधील पिकांचे नुकसान झाले आहे.