
मुसळधार पावसाने आष्टी्च्या सांगवीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात 12 ग्रामस्थ अडकले. तातडीने एनडीआरएफचे टिम घटनास्थळी दाखल झाली. टिमच्या मदतीने 12 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले.
रविवारी पहाटे मुसळधार पावसाने आष्टी तालुक्यामध्ये हाहाकार उडवून दिला. आष्टी तालुक्यातील सांगवीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. पुराच्या पाण्यामध्ये 12 नागरिक अडकले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाली पाटील, देविदास धस, सरपंच संदीप खेडकर, शाम धस, सागर धस, विजय खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. एनडीआरएफची टिम मदतीसाठी मागवण्यात आली. दिवसभर मदतकार्य सुरू होतं. सायंकाळी मंगल शहादेव पावसे, कल्पना विष्णू पावसे, राजूबाई भागवत महानोर, सिता भाऊसाहेब महानोर, भाऊसाहेब विठोबा महानोर, भागवत विठोबा महानोर, अशोक भागवत महानोर, शहादेव भानुदास पावसे, विष्णू शहादेव पावसे, कृष्णा विष्णू पावसे, स्वप्नील विष्णू पावसे, प्रविण विष्णू पावसे या 12 जणांना एनडीआरएफच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले.