
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. तिच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात ती सुखरुप असून तिच्या लग्झरी गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
रुपाली भोसले हिने काही दिवसांपूर्वी मर्सिडीज बेंझ ही लग्झरी कार खरेदी केली होती आणि त्याबाबत तिने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला होता. मात्र आज रुपालीच्या मर्सिडीज बेन्झचा जबरदस्त अपघात झाला. यामध्ये ती सुखरुप असून तिच्या या गाडीचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कारच्या अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर तिने अपघात झाला वाईट दिवस असे कॅप्शन देत ब्रोकन हार्टचा इमोजी शेअर केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करुन अपघाताची माहितीही चाहत्यांसोबत तिने शेअर केली आहे.
व्हिडीओत रुपालीच्या गाडीच्या बोनेटला डेन्ट आल्याचे दिसत आहे. मात्र हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.