
अमेरिकन डॉलरपुढे हिंदुस्थानी रुपयाने अक्षरशः नांगी टाकली आहे. सोमवारी रुपयामध्ये सात पैशांची घसरण झाली असून रुपया 88.79 रुपये असा आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. सोमवारी रुपया अमेरिकन डॉलरपुढे 88.69 रुपयांवर उघडला आणि दिवसअखेर 88.79 रुपयांवर बंद झाला. शुक्रवारी रुपयामध्ये चार पैशांची वाढ झाली होती; परंतु सोमवारी पुन्हा एकदा रुपयामध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर ब्रँडेड आणि पेटंट औषधावर 100 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे हिंदुस्थानी रुपयामध्ये मोठी घसरण होत आहे.