ट्रेंड – चिमुकल्यांचा गरबा एकच नंबर!

नवरात्री उत्सवात लहान-मोठे सगळेच गरबा, दांडियाच्या ठेक्यावर नाचताना दिसतात. चिमुरडय़ा मुलीच नव्हे मुलेही काही मागे नाहीत. वेगवेगळ्या गाण्यांवर आणि वेगवेगळ्या स्टाइलमध्ये गरबा खेळणाऱ्या काही लहान मुलांचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होताहेत. डिंपल गोहील या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका लहान मुलाचा गरबा खेळतानाचा भन्नाट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुलगा गॉगल लावून सराईतपणे गरबा खेळताना दिसत आहे. दुसऱ्या एका लहानग्या चिमुकल्याचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल होत आहे. गरब्याच्या ड्रेसमधला हा चिमुकला गलगोटो या गुजराती ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या मुलांचे व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱयांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ही मुले खऱ्या अर्थाने त्यांचे बालपण एन्जॉय करत आहेत अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.