
क्रिकेट आणि इतर क्रीडाप्रकारांसाठी उपकरणे तयार करणारी प्रसिद्ध कंपनी सॅन्सपेरिल्स ग्रीनलॅण्डस्ने (एसजी) आपला व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुढे नेण्यासाठी एक जोरदार पाऊल टाकले आहे. यासाठी त्यांनी जागतिक स्तरावरील कंपनी ‘सेल्सफोर्स’सोबत भागीदारी केली आहे.
या सहकार्यामुळे एसजी क्रिकेट आपली विक्री प्रक्रिया आणि डीलर व्यवस्थापन प्रणाली पूर्णपणे डिजिटल करणार आहे. डिजिटल परिवर्तनाच्या या प्रवासात एसजी क्रिकेट ही ‘सेल्सफोर्स’च्या प्लॅटफॉर्मचा वापर करून कामाचा प्रवाह स्वयंचलित करणार आहे. यामुळे कंपनीची कार्यक्षमता वाढेल आणि ग्राहकांना मिळणारी सेवा अधिक जलद व सुव्यवस्थित होईल. सेल्सफोर्सने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडासाहित्य उत्पादक कंपन्यांबरोबर काम केले आहे; पण हिंदुस्थानातील क्रिकेट उपकरण क्षेत्रात ही त्यांची पहिलीच भागीदारी आहे. त्यामुळे क्रिकेट उपकरण उद्योगातील वाढत्या डिजिटायझेशनकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.