मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी शिवसेना धावली; टेम्पो भरून औषधांचा साठा पाठवला, आता आरोग्याची काळजी

पावसाने राज्यात दाणादाण उडवली असून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले आहे. मराठवाड्यात तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिवसेना मदतीला धावली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी पुढाकार घेत औषधांचा साठा पाठवला आहे.

व्यक्त करण्यात येत असताना या संकटकाळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार शिवसैनिक अहोरात्र मदतकार्यात सक्रिय झाले आहेत. पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केदार दिघे यांनी खारीचा वाटा उचलला आहे. यावेळी पक्षाचे उपनेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, पुणे जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, राज्य संघटक वसंत मोरे, संजय मोरे, सागर मोडक, सुजित थेवरे, नितीन गावडे, अभिषेक जाधव, रोहन आंब्रे, संजय पाठक यांच्या उपस्थितीत औषधांचा टेम्पो रवाना करण्यात आला.

मराठवाड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून शेतीचे नुकसान झाले आहे. त्यातच पुराच्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची भीती पुराच्या पाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवांपर्यंत आरोग्यविषयक मदत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या संस्कार आणि शिकवणीनुसार आम्ही हे मदतकार्य करत आहोत. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे स्थानिक पातळीवर नागरिकांना धीर देत असून मदतकार्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे
– केदार दिघे (ठाणे जिल्हाप्रमुख, शिवसेना)