
सकाळची सुरुवात निरोगी आहाराने आणि उपचाराने केल्यास, आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. पूर्वीच्या काळी सकाळी उठल्यावर दारातील तुळशीचे पान खाल्ले जायचे. परंतु अलीकडे दारात तुळशीच्या जागी इतर शोची झाडे आलेली आहेत. त्यामुळे दारात तुळस असण्याचे महत्त्व आपल्याल माहीत नाही. दारातील तुळशीच्या एका पानात सौंदर्याचा खजिना दडलेला आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शिवाय आपल्या त्वचेला देखील नैसर्गिकरीत्या चमक मिळते.
तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि रक्त शुद्ध करतात. रक्त स्वच्छ असताना चेहरा आपोआप चमकतो. म्हणूनच तुळशीचे पाणी त्वचेला निरोगी आणि आतून चमकदार बनवते.
सकाळी तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे
तुळशीचे पाणी बॅक्टेरिया नष्ट करून मुरुम आणि मुरुमांची समस्या कमी करते. नियमित सेवनाने चेहऱ्यावरील डाग हलके होण्यास देखील मदत होते.
तुळशीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेच्या पेशी दुरुस्त करतात आणि नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते.
सकाळी तुळशीचे पाणी पिल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते, ज्यामुळे त्वचा जास्त काळ हायड्रेटेड आणि ताजी राहते.
तुळशीतील व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचा तरुण आणि चमकदार राहते.
स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती कधी सुरू होते? त्याची काही सामान्य लक्षणे जाणून घ्या
तुळशीचे पाणी कसे बनवायचे?
४ ताजी तुळशीची पाने घ्या. ही पाने एक ग्लास कोमट पाण्यात रात्रभर भिजवा.
पाणी गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या.
सकाळी तुळशीचे पाणी पिणे हे त्वचेसाठी नैसर्गिक सौंदर्य टॉनिकसारखे आहे. ते केवळ चेहराच उजळवत नाही तर संपूर्ण शरीर निरोगी ठेवते. म्हणूनच आजपासून दिवसाची सुरुवात निरोगी करायची असेल तर, तुमची सकाळ तुळशीच्या पाण्यानेच सुरू करा.