
बॉलीवूडची प्रसिद्ध निर्माती दिग्दर्शक फराह खान आणि बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या दोघांनी एकमेकींना अनफॉलो केल्याच्या चर्चांना उधाळ आले होते. यांच्यात नेमके झाले तरी काय याची उत्सुकता चाहत्यांमध्ये पसरली असनाच आता फराह खानने यावर मौन सोडले आहे.
काही दिवसांपर्वी दीपिका पादुकोणच्या आठ तासांच्या शिफ्टच्या मागणीवरून इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर फऱाहने एका शोमध्ये खिल्ली उडवली होती. त्यानंतर दोघींनी एकमेकिंना अनफॉलो केले आणि त्यानंतर दोघी सगळीकडे चर्चेचा विषय झाल्या. मात्र आता फराह खानने यावर मौन सो़डले आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत फराह म्हणते की, त्या दोघी याआधीही एकमेकींना फॉलो करत नव्हत्या. हॅप्पी न्यू ईअर सिनेमाच्या शुटींग दरम्यान आम्ही दोघींनीही इन्स्टाग्रामवर बोलायचे नाही असे ठरवले होते. त्यापेक्षा आपल्याला बोलायचे असल्यास, थेट मेसेज किंवा फोन करायचा असे आमचे ठरले होते. एवढेच नाही तर आम्ही दोघी वाढदिवसालाही एकमेकींना इन्स्टाग्रामवर शुभेच्छा देत नाही. कारण दीपिकाला ते आवडत नाही. मी 8 तासांवरील टिप्पणी विनोद म्हणून केली नव्हती तर दिलीपला सांगण्यासाठी केली होती की आता तोही 8 तास काम करेल तर प्रत्यक्षात तो फक्त 2 तास काम करतो.
दीपिकासोबतच्या नात्याबाबत सांगताना, फराहने सांगितले की, जेव्हा तिने तिची मुलगी दुआला जन्म दिला तेव्हा दीपिकाला भेटणाऱ्या पहिल्या लोकांपैकी ती एक होती. ती पुढे म्हणाली, कोणत्याही गोष्टीचा वादात रूपांतरित करण्याचा हा नवीन ट्रेंड बंद व्हायला हवा.