
मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका वृद्धाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांविरोधात वृद्धाकडून जोरदार निदर्शन करण्यात आलं. पालिका आणि पोलीस मदत न करत असल्याचा आरोप करत वृद्धाने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांविरोधात घोषणा देत वृद्धाने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. मात्र त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न का केला, नेमकं काय आहे प्रकरण, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.