
उज्जैन जिल्ह्याच्या बडनगरमध्ये गुरुवारी एक ट्रॅक्टर ट्रॉली चंबळ नदीत पडून मोठा अपघात झाला. यावेळी ट्रॉलीतील 20 जण नदीत पडले त्यापैकी 17 जणांना वाचविण्यात यश आले. मात्र तीन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा तपास सुरु आहे.
घटनेची माहिती मिळताच, आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना गौतमपुरा रुग्णालयात पाठवले आहे. तर 3 बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंगोरियाजवळ लोकं देवी प्रतिमा विसर्जन करण्यासाठी गेले होते. दरम्यान एका मुलाने ट्रॅक्टर चावी फिरवून गाडी स्टार्ट केली आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसहित नदीत बुडाली.