
आॅक्टोबर हिट सुरु झाल्यानंतर आपल्या त्वचेचे खूप हाल होतात. ही गर्मी आपल्या त्वचेसाठी खूप घातक असते. म्हणूनच उन्हाळा सुरु झाल्यावर, आपल्याला त्वचेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. उन्हाळ्यातील घाम आणि धुळीमुळे चेहरा निस्तेज होतो. यामुळे आपल्या चेहरा रुक्ष आणि निस्तेज दिसू लागतो.
गर्मीच्या दिवसांमध्ये गुलाबजल हे खूप उपयुक्त मानले जाते. गुलाबजल हे बहुतांशी सर्व घरांमध्ये असते, नसेल तर तुम्ही खासकरुन गर्मीच्या मोसमात हे विकत घेऊन या. त्वचेसाठी गुलाबजलचे फायदे हे अपरिमित आहेत.
आपण जाणून घेऊया त्वचेसाठी गुलाबजल कसे उपयुक्त
रात्री झोपण्याआधी गुलाबजल आणि कोरफड जेल फेसपॅक लावल्यास झोपही उत्तम लागते.
निस्तेज त्वचा झाल्यावरही गुलाबजल हा एक रामबाण उपाय आहे. निस्तेज त्वचेला गुलाबजल लावल्यामुळे, त्वचा उजळ होण्यास मदत होते.
गुलाबजलमधील पोषक द्रव्ये ही त्वचेसाठी उपयुक्त आहेत, म्हणूनच फार पूर्वीपासून गुलाबजल हे सौंदर्यसाधनेत वापरले जाते.
https://www.saamana.com/use-these-tips-when-including-pulses-in-your-diet-read-in-detail/
गुलाबजल केवळ त्वचेसाठीच नाही तर, केसांसाठी सुद्धा खूप पोषक मानले गेलेले आहे.
त्वचेसाठी गुलाबजल हे टोनर म्हणून काम करते. त्यामुळे त्वचा हाइड्रेट होण्यास मदत होते.
गुलाबजल फेस पॅकमध्ये कालवून लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो, तसेच त्वचेला निखार येण्यासही मदत होते.
गुलाबजलामध्ये थोडे पाणी मिसळुन हे पाणी उन्हातून घरी आल्यावर त्वचेवर फवारल्यास त्वचेला तजेला प्राप्त होतो.
कोरफड जेल, गुलाबपाणी फेसपॅक केल्यास हा फेसपॅकही गर्मीत एक उत्तम पर्याय मानला जातो.
https://www.saamana.com/use-these-tips-when-including-pulses-in-your-diet-read-in-detail/
मुलतानी माती आणि गुलाबजल हा फेसपॅकही सर्वात उत्तम फेस पॅक मानला जातो.
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी सुद्धा गुलाबजल हा बेस्ट पर्याय आहे.
गुलाबजलाचे सौंदर्य आणि शारिरीक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळेच गुलाबजलाची एखादी बाटली ही आपल्या घरात असणे हे केव्हाही उत्तम आहे. येत्या गर्मीला तोंड देताना तुम्हीही घरी एक गुलाबजल बाॅटल आणून ठेवा.
(वरील कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)


























































