
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स बिल गेट्स यांनी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त हिंदुस्थानच्या इनोव्हेशन क्षेत्रातील नेतृत्वाची प्रशंसा केली आहे. सिएटलमधील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावास आणि गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात गेट्स म्हणाले, “हिंदुस्थान इनोव्हेशनमध्ये जगाचे नेतृत्व करत आहे. हिंदुस्थानने असंख्य उपक्रम आणि उपाययोजना विकसित केल्या आहेत, ज्या ग्लोबल साउथमधील लाखो लोकांचे जीवन वाचवू शकतात आणि सुधारू शकतात.”
महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात गेट्स यांनी गांधींच्या तत्त्वांचा उल्लेख करत म्हटले, “महात्मा गांधींच्या १५६व्या जयंतीनिमित्त एकत्र येणे ही आनंदाची बाब आहे.” या कार्यक्रमात वॉशिंग्टन आणि सिएटलमधील नेक अधिकारीही सहभागी झाले होते. हिंदुस्थानच्या इनोव्हेशनमुळे जागतिक दक्षिणेकडील देशांना फायदा होत असल्याचे गेट्स यांनी अधोरेखित केले.