
धारावीतील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आणि छत्रपती शिवाजी राजे विद्यालय या दोन शाळांमध्ये शुक्रवारी ‘एली’ यांत्रिक हत्तिणीने बच्चे कंपनीची मने जिंकली. या एज्युकेशनल एलिफंट शोमध्ये स्पर्श होताच तिची थरथरणारी त्वचा, तिचे हलणारे सुपाएवढे कान आणि वरखाली होणारी सोंड पाहून विद्यार्थी हरखून गेले. या हत्तिणीला अभिनेत्री दिया मिर्झाने आवाज दिला आहे. हत्तींच्या समस्या ‘एली’च्याच मुखाने ऐकून बच्चे कंपनीचे हृदयही हेलावले. मॅटर्ली फाऊंडेशन, सैरिक संस्था आणि ‘पेटा’च्या सहकार्याने आयोजित या उपक्रमप्रसंगी महात्मा फुले एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबईचे अध्यक्ष, माजी आमदार बाबुराव माने, मॅटर्ली फाऊंडेशनच्या आयशा शेख, विनय दुबे, विनय करीर, ‘पेटा’च्या मीनल शहा, प्रिं. स्वाती होलमुखे, प्रिं. श्रद्धा माने, वीणा दोनवलकर, संस्थेचे सचिव दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.