
पुण्यातील कात्रज येथील सरहद ग्लोबल स्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेज येथील संगीतकार श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचं उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रवक्ते व जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान तसेच राज्य समन्वयक वसंत मोरे उपस्थित होते.