बैजू पाटील यांचा आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत जागतिक डंका! ‘वल्र्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर – २०२५’ मध्ये देशाला पहिल्यांदाच रौप्यपदकाचा मान

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि भारतीय वन्यजीव छायाचित्रणाचा अभिमान असलेले प्रख्यात फोटोग्राफर बैजू पाटील यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे. जगप्रसिद्ध ‘वल्र्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर – २०२५’ या स्पर्धेत बैजू पाटील यांनी दुसरे स्थान पटकावत भारतासाठी रौप्यपदक जिं-कले आहे.

ही कामगिरी केवळ वैयक्तिक विजय नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. या स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच रौप्यपदक मिळाले असून बैजू पाटील यांनी त्यांच्या कलात्मक दृष्टिकोनातून भारतीय वन्यजीव छायाचित्रणाला जागतिक स्तरावर नवी ओळख दिली आहे.

‘वल्र्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर’ ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धांपैकी एक आहे, जी विशेषतः पक्षी छायाचित्रणासाठी समर्पित आहे. यावर्षी या स्पर्धेत जगभरातील ३३,००० पेक्षा अधिक छायाचित्रकारांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा युनायटेड किंगडममध्ये आयोजित केली जाते आणि जागतिक पातळीवर पक्षी छायाचित्रणाची सर्वाेत्तम मानक मानली जाते. तांत्रिक कौशल्याबरोबरच प्रचंड संयम, निसर्गातील पैलूवर नजर आणि निर्भय धाडसाची आवश्यकता असते. अशा कठीण स्पर्धेत बैजू पाटील यांची ही कामगिरी भारतीय छायाचित्रण इतिहासातील सुवर्णक्षण ठरली आहे.

हे छायाचित्र महाराष्ट्रातीलअहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गा-वात टिपले गेले, जे पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीसाठी जागा-fतक स्तरावर प्रसिद्ध आहे. छायाचित्रात एक स्वॅलो पक्षी उडतानाचा क्षण बैजू यांनी विलक्षण कोनातून टिपला आहे. जमिनीवर उलटे झोपून, झेंडूच्या पुâलांच्या शेतातून हा क्षण ते कॅमेNयात पकडू शकले. पक्ष्याची गतिमान उड्डाणशैली, नैसर्गिक प्रकाशाचा सुंदर वापर आणि झेंडूच्या पुâलांची पाश्र्वभूमी या सर्वांनी मिळून हे छायाचित्र तांत्रिक, भावनिक व कलात्मक दृष्टिकोनातून उत्कृष्ट कलाकृती ठरले आहे. ‘थ्रू द मॅरीगोल्ड’ या शीर्षकाच्या अप्रतिम छायाचित्राची यावर्षीचे विजेते छायाचित्र म्हणून निवड करण्यात आली.

खास बाब म्हणजे बैजू पाटील यांची आणखी तीन छायाचित्रे अां-fतम फेरीपर्यंत पोहोचली. त्यापैकी तीन छायाचित्रे या स्पर्धेच्या अधिकृत पुस्तकात प्रकाशित होणार असून, हे पुस्तक जागतिक दर्जाच्या छायाचित्रणाचे संकलन मानले जाते. स्पर्धेच्या अंतिम निकालात वॅâनडाला सुवर्णपदक, भारताचे बैजू पाटील यांना रौप्यपदक आणि हंगेरीला कांस्यपदकाने गौरवण्यात आले.

बैजू पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास

३६ वर्षांहून अधिक अनुभवासह बैजू पाटील यांनी १६५ पेक्षा आ-fधक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. त्यांचे छायाचित्रण हा केवळ निसर्गसौंदर्याचा उत्सव नाही, तर ते संवर्धन, शिक्षण व सामाजिक जागरूकतेचे एक सामथ्र्यशाली माध्यम आहे. बैजू पाटील हे शाळा, महाविद्यालये व पर्यावरणीय संस्थांमध्ये जैवविविधता, पक्षीसंवर्धन आणि पर्यावरणीय शाश्वततेबाबत व्याख्याने व जनजागृती कार्यक्रम घेत असतात.

हा देशाचा विजय : बैजू पाटील

‘ही स्पर्धा जिंकणे हे माझे आजीवन स्वप्न होते. अनेकदा अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो, पण यंदा ते स्वप्न खरे झाले. हा विजय फक्त माझा नाही, तो संपूर्ण भारताचा आहे. जागतिक मंचावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मला सन्मान मिळाला. हा पुरस्कार प्रत्येक नेचर फोटोग्राफरसाठी आहे, जो पर्यावरण रक्षणासाठी नि:स्वार्थपणे काम करतो.’