पुढील वर्षी सरकारी नोकरीत महाभरती

सरकारी नोकरभरतीची प्रक्रिया अतिशय संथगतीने होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे, पण आता या प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची नोकरभरतीची प्रक्रिया वेगवान करून पुढील वर्षात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होणार आहे. त्यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने अनुकंपा तत्त्वावरील तसेच लिपिक श्रेणीतील 10 हजार 309 उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरीत करण्याचा कार्यक्रम आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.